राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे, पदाधिकारी आणि मनपा अधिकाऱ्यांनी बाणेर बालेवाडी चा पाणी प्रश्न निर्माण केलाय – अमोल बालवडकर

पुणे : बाणेर बालेवाडी परिसरात गेली चार पाच वर्ष पाणीटंचाई नव्हती. मग आताच का? असा प्रश्न भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी उपस्थित केला आहे. शिवाय बालवडकर यांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे कि हा प्रश्न राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे, परिसरातील व शहरातील त्यांचे पदाधिकारी पदाधिकारी आणि मनपा अधिकाऱ्यांनी मिळून केला आहे. त्यामुळे नागरिकांनीच आता फोन करो आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारावा, असे आवाहन बालवडकर यांनी परिसरातील नागरिकांना केले आहे.
बालवडकर म्हणाले महापालिकेत आता प्रशासक आहे. त्यामुळे साहजिकच शहराच्या प्रश्नांची जबाबदारी राज्य सरकारची आहे.  बाणेर बालवाडीत 2017 साली पाण्याची वितरण व्यवस्था नव्हती. प्रश्न गंभीर होता. मी नगरसेवक झाल्यानंतर नियोजन केले. समान पाणीपुरवठा योजने चे काम सुरु केले.  मात्र आता प्रशासनाने तोच पाणीपुरवठा विस्कळीत केला आहे. बालवडकर म्हणाले, पाणी प्रश्न मिटवणार भाजप कुठे आणि पाणी प्रश्न निर्माण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस कुठे? एवढा फरक आहे. पाण्यासाठी झगडणारा भाजप कुठे आणि नागरिकांची मजा पाहणारा राष्ट्रवादी कुठे?
बालवडकर पुढे म्हणाले, चांदणी चौक पाणी टाकी मधून 47 MLD बाणेर बालवाडीत पाषाण ला पाणीपुरवठा होत होता. गेल्या तीन महिन्यापासून या पाण्यात कपात करण्यात आली. 10 MLD पेक्षा जास्त कपात करण्यात आली आहे. त्यामुळे प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे टँकर पाठवण्याची सोसायट्यांची मागणी आहे. असे नीच पातळीवरील राजकारण राष्ट्रवादी  करते.
बालवडकर म्हणाले पाणी प्रश्न निर्माण करण्यात  आला आहे. राजकीय सूडासाठी हा प्रश्न उभा केलाय. राष्ट्रवादीने हा प्रश्न निर्माण केलाय. बाबुराव चांदेरे, पदाधिकारी,मनपा अधिकारी असे सर्वानी मिळून हा प्रश्न निर्माण केलाय. महापालिका अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देत आहेत. प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले आहे. याला सरकार जबाबदार आहे. बाबुराव चांदेरे यांनी याबाबत कधी निवेदन दिले नाही. चांदेरे चार वर्ष झोपले होते. आता निवडणुकीसाठी प्रयत्न करताहेत.

: फोन करो आंदोलन सुरु करा

बालवडकर पुढे म्हणाले, चांदेरे उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ही जबाबदारी अजित दादांची देखील आहे. पवार देखील याचे समर्थन करताहेत का? चुकीच्या पद्धतीने काम सुरु आहे. राजकारण करणाऱ्या पक्षाला यश मिळणार नाही. तुम्ही कितीही काही जरा. पाणी हेच जीवन आहे. मात्र भाजपचे लोक नाराज होणार नाहीत. नागरिकांची तुम्ही मजा पाहत आहात. आम्ही तो प्रश्न सोडवू. अधिकाऱ्यावर कुणाचा दबाव आहे? पाणी कपात नसताना पाणी का कमी केले?
नागरिकांना आवाहन आता तुम्ही फोन करो आंदोलन सुरु करा. आयुक्त आणि पाणीपुरवठा अधिकाऱ्याचे नंबर आम्ही देतोय. त्यावरून प्रशासनाला जाब विचारा. असे बालवडकर म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here