Skip to content Skip to footer

सुजय भाजपात गेले तुम्ही शिवसेनेत या – संजय राऊत

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी आज भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हाती भाजपा पक्षाचा झेंडा देऊन नगर जिल्ह्याला भाजपाचा बालेकिल्ला बनवण्याची जबाबदारी ही सुजय विखे पाटील यांच्यावर सोपवली आहे.

या प्रवेशानंतर काही मिनिटांतच, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना शिवसेना पक्षात येण्याचे आमंत्रणच देऊन टाकले आहे. सुजय भाजपात गेला, आता तुम्ही शिवसेनेत येऊन युती मजबूत करा, अशी ऑफर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. काँग्रेस विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण पाटील सुजय यांच्या भाजपा पक्ष प्रवेशावर बोलताना सुजय आपला निर्णय घेण्यासाठी स्वतन्त्र आहे. असे मत विखे पाटलांनी जाहीर केले होते.

सुजय विखे यांची खासदारकीचे तिकीट भाजपा पक्षातून जवळपास निश्चित मानले जात आहे. नगर लोकसभेसाठी भाजपाच्या निवड समितीकडे त्यांच्या नावाची शिफारस करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्टच केले आहे.

त्यांचे तिकीट कन्फर्म झाल्यास राधाकृष्ण विखे पाटील काय भूमिका घेणार, मुलाच्या विरोधात प्रचार करणार का, यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवरच, शिवसेनेना पक्षाने ‘मौके पे चौका’ मारला आहे. यावर राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेस सोडणार का ? अशीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे.

Leave a comment

0.0/5