Skip to content Skip to footer

शरद पवारांची माघार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात.

मुंबई | युतीचा हा मोठा विजय आहे, देशात मोदींना पाठिंबा देणारे वातावरण आहे. एकदा सभेत मोदी म्हणाले होते की शरद पवार हवा का रुख भाप लेते है, यावेळी त्यांना हे समजले असावे म्हणून शरद पवार यांनी माघार घेतली असावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत म्हणाले.

शरद पवारांची माढा मतदारसंघातून माघार हा युतीसाठी मोठा विजय आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्वतः याबाबत घोषणा केली.

दरम्यान, आमच्या कुटुंबात याबाबत चर्चा झाल्याचं पवारांनी सांगितलं. ही चर्चा माझ्यादृष्टीने महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले.

Leave a comment

0.0/5