Skip to content Skip to footer

हिंदू नामर्द नाही, शिवसेनेने इम्तियाज जलील यांना ठणकावले……

लोकसभा निवडणुकीच्या निकालात संभाजी नगर मध्ये काही बंडखोरांच्या मदतीने वंचित बहुजन आघाडी तथा एमआयएम पक्षाचे माजी आमदार इम्तियाज जलील निवडून आले. परंतु निवडून आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांनी स्वता संभाजी नगरचे वातावरणच बिघडवून टाकले आहे. खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा वेगळा ठराव मांडला यासाठी एमआयएमच्या नगरसेवकांनी संभाजी नगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ घातला. सभागृहात धुडगूस घालत नगरसेवकांनी राजदंडदेखील पळवला. या गोंधळावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून एमआयएमवर हल्लाबोल केला आहे.

‘लोकसभा निवडणुकीत एक निसटता पराभव अपघाताने झाला म्हणून संभाजीनगरचा हिंदू नामर्द बनलेला नाही. संभाजीनगरातील ‘औरंगाबादे’त घुसून औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची हिंमत हिंदूंच्या मनगटात आहे. हिंदूंच्या अंगावर येणाऱ्या सगळ्यासाठीच हा इशारा आहे. आपल्यातीलच एका खानाने हाती हिरवे फडके बांधून त्याने औरंग्याच्या कबरीवर जरूर नमाज अदा करावेत, पण शिवसेना-भाजप युतीने आपला ‘धर्म’ सोडलेला नाही. संभाजीनगरच्या अस्मितेसाठी व हिंदूरक्षणासाठी शिवसेनेचा लढा चालूच राहील. ओवेसीछाप टोळक्यास उचलून बाहेर फेकल्याबद्दल संभाजीनगर महापालिकेचे अभिनंदन! हे काल घडले, उद्याही घडेल’, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे.

Leave a comment

0.0/5