Skip to content Skip to footer

तटकरे यांनी राजकीय स्वार्थातून बॅरिस्टर अंतुले यांच्याच पाठीत खंजीर खुपसला – नाविक अंतुले

७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा करून सुनील तटकरे यांनी पैसा खिशात घातला. त्यामुळे शेतकऱयांच्या आत्महत्येला राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुनील तटकरे हेच जबाबदार आहे असा आरोप बॅलिस्टर अंतुले यांचे चिरंजीत नाविक अंतुले यांनी तटकरे यांच्यावर लागावला आहे. ते काल रायगड येथे खासदार आनंद गीते यांच्या सभेला आपल्या हजारो मुस्लीम कार्यकर्त्यांसह सभेला उपस्थित होते. काहीच दिवसापूर्वी नाविद यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे रायगड मध्ये हजारो मुस्लीम तरुणांनानी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला होता.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व अंतुलेसाहेब यांच्यात मैत्री होती. काही कारणांनी ते दोघे एकत्र येऊ शकले नाहीत पण आता मुस्लिम समाज उद्धावजींसोबत राहील असे वचनच नविद अंतुले यांनी यावेळी दिले. गुरू हा देवाच्या आधी असतो पण तटकरे यांनी राजकीय स्वार्थातून बॅरिस्टर अंतुले यांच्याच पाठीत खंजीर खुपसला असा संताप नविद अंतुले यांनी व्यक्त केला. याप्रसंगी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार भारत गोगावले, तुकाराम काते, प्रकाश सुर्वे, प्रवीण दरेकर आधी उपस्थित होते. तसेच भाजपा-शिवसेना-रिपाई आणि मित्रपक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा सभेला उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5