Skip to content Skip to footer

नियोजित दौरा सोडून सुनील शेळके धावले दुर्घटनाग्रस्तांच्या भेटीला

नियोजित दौरा सोडून सुनील शेळके धावले दुर्घटनाग्रस्तांच्या भेटीला

राज्यातील अनेक भागात सध्या धुमाकूळ घातला आहे. अनेक गावांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे दुर्घटना देखील घडल्या आहेत. पुढील काही दिवस पावसाचे प्रमाण जास्तच राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. लोणावण्यातही प्रचंड पावसामुळे एक दुर्घटना घडली आहे. लोणावळ्यातील हनुमान टेकडी भागात अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन घराची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. सदर दुर्घटना घडल्याचे समजताच तळेगावचे भाजप नगराध्यक्ष सुनील शेळके यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

सदर घरात एक मुलगा आणि एक मुलगी आपल्या वडिलांसमवेत राहत होते. यापैकी मुलाचं दुर्घटनेत निधन झालं आहे तर मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या कुटुंबीयांची भेट घेऊन सुनील शेळके यांनी जे काही सहकार्य आणि मदत लागेल ती करण्याची भावना व्यक्त केली आहे. सुनील शेळके यांचा आज गावभेट दौरा नियोजित होता. मात्र दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांनी आपला नियोजित दौरा रद्द करून दुर्घटनाग्रस्तांना धीर देण्यासाठी धाव घेतली. भरपावसात त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच रुग्णालयात जाऊन उपचार सुरु असलेल्या जखमींची भेट घेत त्यांना आधार दिला आहे.

Leave a comment

0.0/5