Skip to content Skip to footer

भाजपाची पहिली यादी जाहीर,चंद्रकांत पाटील कोथरुडमधून लढणार

भाजपाची पहिली यादी जाहीर,चंद्रकांत पाटील कोथरुडमधून लढणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर भाजपने आज आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शिवाय सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांच्या नावाचीही घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे यंदा प्रथमच विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. भाजपच्या पहिल्या यादीत यावर शिक्कामोर्तब झालं आहे. पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील विधानसभा निवडणूक लढणार आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचही नाव आहे. शिवाय माजी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, पुण्याच्या महापौर मुक्त टिळक, पंकजा मुंडे इत्यादी दिग्गजांचा समावेश आहे.

सातारा विधानसभा मतदारसंघातून शिवेंद्रराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. इंदापूर येथून हर्षवर्धन पाटील,राहुरीतून शिवाजी कर्डीले, ऐरोलीतून संदीप नाईक, भोकरदन येथून रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे, फुलंब्रीतून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे इत्यादींचा या यादीत समावेश आहे. भाजपच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी १२५ जागांवरील उमेदवारांची आज भाजपने घोषणा केली आहे.

Leave a comment

0.0/5