Skip to content Skip to footer

मेट्रो कारशेड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, शिवसेना नेत्याची मागणी

मेट्रो कारशेड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, शिवसेना नेत्याची मागणी

कांजूरमार येथील मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या मुद्यावरून राज्य सरकार आणि राज्य सरकार एकमेकांसमोर उभे थाटले आहे. त्यात या जागेवर बांधकाम करण्यास उच्च न्यायालयाने MMRDA ला काम थांबवण्याचे आदेश दिले आहे.

हे. तर, दुसरीकडं मेट्रोच्या कामास देखील विलंब होत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार व उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यस्थी करावी अशी मागणी नेते करत आहेत.

आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ आता शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पवारांनी मध्यस्थी करावी अशी इच्छा एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली आहे.
तसेच ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नेहमीच महाविकास आघाडीला मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे या ही प्रकरणात ते लक्ष घालतील. शरद पवार ज्या ज्या वेळी असे प्रसंग येतात तेव्हा मार्गदर्शन करतात. पवार साहेबांनी पुढाकर घेतला तर यातून मार्ग निघू शकतो,’ असा विश्वास देखील शिंदेनी व्यक्त केला आहे.

Leave a comment

0.0/5