Skip to content Skip to footer

वृक्षतोड अधिकाऱ्यांना पाकव्यप्त काश्मीर मध्ये पाठवा -आदित्य ठाकरे

वृक्षतोड अधिकाऱ्यांना पाकव्यप्त काश्मीर मध्ये पाठवा -आदित्य ठाकरे
मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनी येथील वृक्षतोड करण्यास सुरुवात झाली आहे. वृक्षतोड करण्याच्या विरोधात आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झालेले दिसून येत आहेत. आदित्य ठाकरेंनी वृक्षतोडीवरून मेट्रो अधिकाऱ्यांवर तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. याविषयी बोलताना ठाकरे यांनी ज्या तत्परतेने मेट्रोचे अधिकारी आरे काॅलनीतील झाडे तोडत आहेत ते पाहता त्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवा. तसेच आरेमधील जैवविविधता संपवण्याचा हा जो घाट रचला आहे तो लज्जास्पद आहे अशा शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. झाडं तोडण्यापेक्षा या अधिकाऱ्यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ नष्ट केले तर अधिक बरं होईल ना?असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

काही दिवसापूर्वी आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आरे मध्ये असणाऱ्या औषधी वनस्पती व वावरणाऱ्या प्राण्याविषयी माहिती दिली होती. तसेच शिवसेना आरे विरोधात आवाज उठवणार असे सुद्धा बोलून दाखविले होते. दरम्यान, मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेड साठी आरे कॉलनी येथील वृक्षतोड करण्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका (4 ऑक्टोबर) मुंबई उच्च न्यायालयाकडून फेटाळून लावण्यात आल्या आहेत. मुंबई वृक्ष प्राधिकरणाने कारशेडसाठी आरे मधील २७०० झाडे तोडण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दिला होता, ज्यांनंतर या निर्णयाच्या वैधतेवर प्रश्न करत अनेक सामाजिक पर्यावरणस्नेही संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या.

Leave a comment

0.0/5