Skip to content Skip to footer

सर्दी, ताप, खोकल्याची औषधें देऊ नका; औषध विक्रेत्यांना सूचना

सर्दी, ताप, खोकल्याची औषधें देऊ नका; औषध विक्रेत्यांना सूचना

सर्दी, ताप आणि खोकला ही कोरोनाची प्रमुख लक्षणे आहेत. अनेक रुग्ण ही लक्षणे दिसल्यावर मेडिकल मधून सिरप आणि गोळ्या आणून घरच्या घरी इलाज करतात

यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे औषध विक्रेते- फार्मासिस्टनी ताप, सर्दी, खोकला आणि डोकेदुखीवरील औषधे अजिबात विकू नये. जर या औषधांची मागणी कोणी केली तर त्याची माहिती मुंबई महानगर पालिकेला द्यावी किंवा त्यांना नजीकच्या फ्ल्यू क्लिनिकमध्ये पाठवावे, अशी सूचना इंडियन मेडिकल असोसिएशनने अर्थात आयएमएने फार्मासिस्टला दिल्या आहेत.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असलेली पहावयास मिळत आहे. त्यात अनेक जण भीतीने वा कोरोनाग्रस्तांकडे वेगळ्या नजरेने बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन असल्याने लक्षणे लपवणाऱ्यांची संख्याही खूप आहे. अशी लक्षणे असली तर कोरोना असेलच असेही नाही. पण अशी लक्षणे असणाऱ्यांना शोधून काढत कोरोनाचा फैलाव कमी करण्याकडे महापालिकेचा कल आधीक वाढला आहे.

रुग्ण जर मेडिकलमधून औषधे घेऊन गेली तर त्यांचा धोका वाढेलच, पण इतरांना ही धोका निर्माण होईल. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी यावरील औषधे न देता, औषधे मागणाऱ्यांची माहिती पालिकेला कळवावी असे आवाहन औषध विक्रेत्यांना करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने दिली आहे.

Leave a comment

0.0/5