Skip to content Skip to footer

लॉकडाऊन मध्ये गावी जाणाऱ्यांची कोरोना चाचणी होणार मोफत

लॉकडाऊन मध्ये गावी जाणाऱ्यांची कोरोना चाचणी होणार मोफत

आणि संचारबंदीमुळे विविध राज्यातील आणि जिल्ह्यातील मजूर, कामगार, विद्यार्थी आणि पर्यटक अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने शिथिलता दिल्यानंतर या सर्वच नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विविध जिल्ह्यांत किंवा इतर राज्यात प्रवास करणाऱ्या व्यक्तींना वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलं आहे. ई-पास किंवा पोलीस परवानगी मिळविण्यासाठी कोविड १९ ची लक्षणे नसलेले वैद्यकीय प्रमाणपत्र बंधनकारक आहे. मात्र, ही तपासणी मोफत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे.

लॉकडाऊन-मध्ये-गावी-जाणाऱ-Lockdown-in-the-village-going

तसेच ‘शासकीय तसेच महापालिकांचे वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत ही वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. लॉकडाऊनच्या काळात गावी जाऊ इच्छिणारे स्थलांतरीत कामगार, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या व्यक्ती यांना प्रवास सुरु करण्यापुर्वी आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणी मोफत केली जाणार आहे,’ असे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आले आहे.दरम्यान, देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वोत्तोपरी मेहनत घेतली जात आहे

Leave a comment

0.0/5