Skip to content Skip to footer

रमजानच्या पार्श्वभूमीवर मोहरम कमिटीने घेतला हा निर्णय वाचा

रमजानच्या पार्श्वभूमीवर मोहरम कमिटीने घेतला हा निर्णय वाचा

देशात कोरोनाने थैमान घातलेला आहे. त्यामुळे याचा परिणाम समाजाच्या सर्वांगावर झाल्याचं दिसत आहे. या कोरोनामुळे धार्मिक परंपरादेखील मोडण्याची वेळ आली आहे. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. तर ईद 1 दिवसावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे अंजुमन इस्लामिया, मोहरम कमेटीने ईद आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे.

लॉकडाऊन सुरु असल्याने पहिल्यांदाच ईदमध्ये गळाभेट होणार नाही. तसेच सामुदायिक नमाज पठण देखील होणार नाही. मल्लीताल डीएसएस मैदानात एसडीएम विनोद कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली. एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देताना सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. ज्याप्रमाणे रमजानच्या शुभेच्छा घरी राहून दिल्या, त्याप्रमाणे ईदमध्ये नमाज पठण देखील घरी राहूनच होईल, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नये. प्रत्येकाने जागरुक रहावे, असे आवाहन मुस्लिम समुदायाला करण्यात आले.

Leave a comment

0.0/5