Skip to content Skip to footer

लोकसहभागातून कोरोनावर मात करूया ! – उद्धव ठाकरे

लोकसहभागातून कोरोनावर मात करूया ! – उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वर्धापन दिनानिमित्त सीपीआरमध्ये १४आयसीयू आणि २० ऑक्सीजन युक्त बेडचे लोकार्पण व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे केले. यावेळी कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी शासन युद्धपातळीवर कार्य प्रयत्न करत आहे. लोकसहभागातून मात करण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण सोहळ्यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे केले. शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सीपीआरमध्ये क्रॉम क्लिनीकल रिसर्च अँड मेडिकल टुरिझम प्रा. लिचे डॉ. धनंजय लाड यांनी तयार केलेल्या कोरोना कक्षाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना संक्रमण काळात महाराष्ट्रात आरोग्य सुविधांची कमतरता जाणवली. त्यामुळे राज्यात जास्तीत जास्त आरोग्य सेवा कशा मिळतील, याला प्राधान्य दिले. रक्ताचा तुटवडा भासू लागल्यानंतर जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले. संकट कोणतेही असले, तरी महाराष्ट्रातील जनता त्याला सामोरे जाते.

लोकसहभागातून कोरोनावर-Corona through public participation

रक्तदान करण्यासाठी जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत नाही. तसेच कोरोना काळात राज्यात व्हेंटिलेटर, पीपीई किट, एन- ९५ मास्कची कमतरता जाणवत होती. केंद्र सरकार हे साहित्य पुरवत आहे; पण अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन या आरोग्य साहित्याचा पुरवठा केला. कोरोनाचे संकट कमी झालेले नाही. त्यामुळे योग्य वेळी हा कक्ष उभारला असून, रुग्णांवर वेळेत उपचार होऊन ते बरे व्हावेत, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्हाधिकारी मा.दौलत देसाई, मनपा आयुक्त डाॅ.मल्लीनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे,
प.महाराष्ट्र देवस्थान समिती कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.बी.सी.केम्पी पाटिल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डाॅ.सौ.सरीता घोरपडे, क्राॅम क्लिनीक रीसर्च अँड मेडिकल टुरीझमचे डाॅ. धनंजय लाड, श्री. नितीन पाटील आदिंसह मान्यवर उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5