Skip to content Skip to footer

महाराष्ट्रातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या..

मनिषा म्हैसकर यांच्याकडे पर्यावरण विभागाची सूत्रं

आज (शुक्रवार) राज्य सरकारनं राज्यातील तीन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. दरम्यान १९९२ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी मनिषा म्हैसकर यांच्याकडे आता पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवपदाची सूत्रं सोपवण्यात आली आहे.

आज राज्यातील तीन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. १९९२ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी मनिषा म्हैसकर यांच्या हाती आता पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्याकडे सामान्य प्रशासन मुख्य प्रोटोकॉल अधिकारी आणि प्रधान सचिवपदाची जबाबदारी होती. तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त आशुतोष सलिल यांच्याकडे आता पर्यटन विभागाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आशुतोष सलिल हे २०१० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

२०१६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या खांद्यावर आता यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्याकडे सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, भंडारा ही जबाबदारी देण्यात आली होती.

Leave a comment

0.0/5