Skip to content Skip to footer

स्वतः गाडी चालवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्याकडे रवाना…..!

स्वतः गाडी चालवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्याकडे रवाना…..!

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आहे. उद्धव ठाकरे स्वत: गाडी चालवत पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. पुण्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी तसेच वैद्यकीय यंत्रणा यांच्याशी ते चर्चा करणार आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे विभागीय आयुक्तालयात जाऊन पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या बैठकीला उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारही उपस्थित असणार आहेत. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सुद्धा उपस्थित असणार आहे.

Leave a comment

0.0/5