Skip to content Skip to footer

“विकेल ते पिकेल” या धोरणावर मुख्यमंत्री साधणार शेतकऱ्यांशी संवाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विविध कृषी विषयक योजनांच्या संदर्भात आज दुपारी १२:०० वाजता शेतकऱ्यांची संवाद साधणार आहे.या कार्यक्रमात मुख्यमंत्री शेतकऱयांशी शेतीविषयक येणाऱ्या अडचणी संबंधी त्यांच्याशी संवाद साधणार आहे.या होणाऱ्या चर्चेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना केले आहे. सदर कार्यक्रम (http://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM) वर लाईव्ह प्रसारण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री ग्रामपातळीवरील कृषि विकास कार्यक्रमाची रुपरेषा मांडून “चिंतामुक्त” शेतकरी व “शेतकरी केंद्रित” कृषि विकास यावर आपले विचार मांडतील तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषि मंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, कृषि सचिव एकनाथ डवले, पोकराचे प्रकल्प संचालक रस्तोगी, कृषि आयुक्त धीरज कुमार उपस्थित राहणार आहेत.

Leave a comment

0.0/5