Skip to content Skip to footer

नागरिकांना स्वच्छ, शुद्ध पाणी पुरवठा योग्य प्रमाणात होईल, याची खबरदारी घ्यावी! – सुभाष देसाई

नागरिकांना स्वच्छ, शुद्ध पाणी पुरवठा योग्य प्रमाणात होईल, याची खबरदारी घ्यावी! – सुभाष देसाई

औरंगाबाद जिल्ह्यात सध्या मुबलक प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे. सर्व पाणीसाठे, प्रकल्प सरासरी ९८% भरलेले आहेत. टंचाई काळात पाण्याची कमतरता उद्भवू नये यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करावे, या संदर्भात काल उद्योग मंत्री, औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.

यंदा झालेल्या पावसामुळे उत्तम व मुबलक पाणीसाठा जलाशयात आहे. या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास टंचाई काळात पाण्याची कमतरता जाणवणार नाही, यादृष्टीने योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. ते यंत्रणांनी करावे. त्याचबरोबर खुलताबाद नगर परिषदेने प्रस्तावित केलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या पूर्णत्वासाठी प्राधिकरणाने पाठपुरावा करुन योजना पूर्णत्वास न्यावी अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

औरंगाबाद शहराला आवश्यक असणाऱ्या पाणी पुरवठ्यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य नियोजन करुन शहरास योग्य, मुबलक आणि शुद्ध पाणी नागरिकांना उपलब्ध करुन द्यावे. शहर व जिल्ह्यातील नागरिकांना स्वच्छ, शुद्ध पाणी पुरवठा योग्य प्रमाणात होईल याची खबरदारी घ्यावी, असे निर्देशही यावेळी मंत्री देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले

Leave a comment

0.0/5