सटाणा नगरपरिषद हद्दीत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध कामांचा शुभारंभ
नगरसेवक सुनिल मोरे यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रभाग क्र. १ व प्रभाग क्र. ४ मधील नागरिकांची असलेली मागणी पूर्णत्वास नेण्यासाठी पालिकेने पावले टाकली.
पावसाळ्यात प्रभाग क्र. १ मधील भाकशी रोड येथील शाळा, खंडेराव महाराज मंदिर ते ताहाराबाद रोड या परिसरात पावसाचे पाणी साचत होते. त्यातून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागायचे. परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार या परिसरात भूमिगत पाईपलाईन टाकून गटारीचा शुभारंभ स्थानिक नागरिकांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आला. यावेळी नगरसेवक सुनिल मोरे, उपनगराध्यक्षा भारती सूर्यवंशी, प्रभागाच्या नगरसेविका सुनीता मोरकर, नगरसेवक श्री. बाळासाहेब बागुल यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
प्रभाग क्र. ४ मध्ये शिवाजीनगर परिसरातील भूमिगत गटारी व अंतर्गत रस्ते डांबरीकरणाच्या कामांचा शुभारंभ भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव, नगराध्यक्ष सुनिल मोरे, उपाध्यक्ष भारती सुर्यवंशी, प्रभागाच्या नगरसेविका निर्मलाताई भदाणे, नगरसेवक मुन्ना शेख यांच्या हस्ते करण्यात आला.
नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत नागरिकांना आश्वासित केलेल्या कामांची उदघाटने झाली आहेत, ति सर्व कामे कार्यकाळ संपण्याआधी पूर्ण होतील असा विश्वास यावेळी नगराध्यक्ष सुनिल मोरे यांनी उपस्थित नागरिकांना दिला. तसेच आज पर्यंत त्यांनी केलेले सहकार्य असेच पाठीशी असू द्या अशी विनंतीदेखील त्यांनी नागरिकांना केली.