Skip to content Skip to footer

सोंगाड्या हा तमाशात नाचणाऱ्या नाच्यांना नाचवत असतो. मी ठरवले तर या नाच्याला कधीही नाचवू शकतो! – गुलाबराव पाटील

सोंगाड्या हा तमाशात नाचणाऱ्या नाच्यांना नाचवत असतो. मी ठरवले तर या नाच्याला कधीही नाचवू शकतो! – गुलाबराव पाटील

‘केळी पीक विम्याचे निकष पूर्वीप्रमाणे कायम ठेवावेत म्हणून राज्य सरकारने चार वेळा केंद्र सरकारकडे विनंती केली होती, त्याकडे केंद्रातलं सरकार दुर्लक्ष करत आहे. आम्ही मुख्यमंत्री, कृषी आयुक्तांसोबत बैठकाही घेतल्या पण, आता हेच भाजपचे लबाड लांडगे लोकांची दिशाभूल करून आंदोलनाची भाषा करत आहेत’, अशा शब्दांत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.

राज्य सरकारने यावर्षी पीक विम्याचे निकष बदलत शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे, असा आरोप करत भाजपने येत्या ९ नोव्हेंबरला रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली आहे. त्याअनुषंगाने पाटील यांनी भाजपवर टीकेचे बाण सोडले. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी केळी पीक विम्याच्या विषयावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. उन्मेष पाटील यांनी ‘शिंगाडा मोर्चा काढणारे आता सोंगाडे झाले आहेत’, अशा शब्दांत माझ्यावर टीका केली.

मात्र, उन्मेष पाटील यांना माहिती नाही. मी खेड्यातला सोंगाड्या आहे. सोंगाड्या हा तमाशात नाचणाऱ्या नाच्यांना नाचवत असतो. मी ठरवले तर या नाच्याला कधीही नाचवू शकतो. केळी पीक विम्याच्या बाबतीत राज्य सरकारने केंद्राकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. पण केंद्राने सहकार्याची भूमिका दाखवली नाही, असे असताना हे लबाड लांडगे शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. तुमच्यात धमक असेल तर जाऊन मोदींना हलवा, त्यांना केळी पीक विम्याचे निकष पूर्वीप्रमाणे ठेवायला सांगा. केंद्राने केळी पीक विम्याचे निकष पूर्वीप्रमाणे ठेवले तर मी जाहीर व्यासपीठावर भाजपच्या नेत्यांचा सत्कार करेन, असे आव्हानही गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले.

Leave a comment

0.0/5