Skip to content Skip to footer

महिलांना रोजगारासाठी सायकल ब्रँड अगरबत्ती सोबत ठाकरे सरकारचा सामंजस्य करार

महिलांना रोजगारासाठी सायकल ब्रँड अगरबत्ती सोबत ठाकरे सरकारचा सामंजस्य करार

वन संहिता सुधारित खंड १ व २ हे भावी पिढ्यांसाठी तसेच वन विभागातील अधिकारी-कर्मचारी, वन विभागाचे अभ्यासक व सामान्य नागरिक यांना अभ्यासासाठी व कामकाजासाठी उपयुक्त ठरतील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. वन विभागाच्या वन संहिता सुधारित खंड १ व २ चे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वनमंत्री संजय राठोड, पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व इतर अधिकारी यांची उपस्थिती होती.

वन संहिता सुधारित खंड १ मध्ये स्वातंत्र्यपूर्व व्यवस्था, स्वातंत्र्यानंतरची व्यवस्था, लोकसेवा आयोग, वन अधिकारी यांची कामे व कर्तव्ये, सेवा विषयक नियम, बदल्यांचे अधिनियम २००५ व सेवा अधिनियम २०१५ बाबतच्या विविध बाबी संकलित व समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

वन संहिता सुधारित खंड २ मध्ये वन व्यवस्थापन कायदेशीर बाबी, भारतीय वन अधिनियम १९२७ व अंतर्गत नियम, इतर अधिनियम तरतुदी, राखीव वन, संरक्षित वन याबाबत माहिती, महाराष्ट्र खाजगी वन (संपादन) अधिनियम १९७५, वन (संवर्धन)अधिनियम १९८०, वन्यजीव (संरक्षण)अधिनियम १९७२, अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम २००६, पर्यायी वनीकरण अधिनियम २०१६, जैव विविधता अधिनियम २००२ व या अधिनियम खालील विविध नियम याची माहिती देण्यात आली आहे. वन संहिता सुधारित खंड १ व २ आज वन विभाग मार्फत प्रकाशित होत आहेत.

Leave a comment

0.0/5