Skip to content Skip to footer

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक दिवसीय पुणे-सातारा-रत्नागिरी दौऱ्यावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (गुरूवार दि. १० डिसेंबर) सातारा, रत्नागिरी व पुणे अशा तीन जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री कोयनेच्या पोफळी जलविद्युत प्रकल्पाची तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गिकेची पाहणी करणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी मुंबईहून कोयना नगर, सातारा येथे हवाई मार्गाने प्रयाण करणार आहे. यावेळी ते कोयना जलविद्युत प्रकल्पाची पाहणी करणार आहे. पुढे तेथून ते रत्नागिरी जिल्ह्यातील पोकळी जलविद्यूत प्रकल्पाची पाहणी करणार आहे तसेच तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. याच दरम्यान ते कोयना धरणाची सुद्धा पाहणी करणार आहे.

कोयना नगर सातारा येथील दौरा आटपून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोगदा क्र. २ च्या प्रकल्पस्थळाची पाहणी करणार आहे. तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते कुसगाव या दरम्यानच्या नवीन मार्गिकेच्या बांधकामाची सुद्धा पाहणी करणार आहे. या दौऱ्यादरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली-कुसगाव दरम्यानच्या नवीन बांधकामाची पाहणी करणार आहे.

Leave a comment

0.0/5