Skip to content Skip to footer

ब्रिटनमधून नागपूर आणि गोंदियामध्ये फिरला नंतर निघाला कोरोना पॉझिटिव्ह

ब्रिटनमधून नागपूर आणि गोंदियामध्ये फिरला नंतर निघाला कोरोना पॉझिटिव्ह

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्यामुळे सव खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटन आणि आखाती देशातून आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यात ब्रिटनमध्ये करोनाच्या नव्या प्रकाराचे संक्रमण सुरू असतानाच नागपूरमध्ये परतलेल्या एका तरुणामुळे नागपूरमध्ये मोठी खळबळ माजली आहे. नागपूरमधील २८ वर्षीय युवक पुण्यात एका कंपनीत कामाला आहे. कंपनीच्या कामानिमित्ताने महिनाभरापूर्वी तो इंग्लडला गेला होता. २९ नोव्हेंबरला तो नागपूरला परतला.

सुरूवातील लक्षणं नसल्याने त्याला होम क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, याच दरम्यान तो घरी न राहता शहरात फिरला. त्याचबरोबर गोंदियालाही जाऊन आला. त्यानंतर त्याला करोनाची लक्षणं दिसून आली. १५ डिसेंबर रोजी त्याने नंदनवन येथील आरोग्य केंद्रात चाचणी केली. त्यात त्याला करोना झाल्याचे समोर आले आहे.

सदर युवक इंग्लडवरून परतल्यानंतर त्याला विशेष कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्याला स्वतंत्र ठेवण्यात आलं असून, त्याचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्याला कोणता करोना झाला आहे? हे स्पष्ट होणार असलं तरी यामुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली असून प्रशासन जागे झाले आहे.

Leave a comment

0.0/5