Skip to content Skip to footer

मनसेच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही – शिवसेना

मनसेच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही – शिवसेना

शिवसेना पक्ष औरंगाबादचा नेहमीच संभाजी नंतर असा उल्लेख करत आलेली आहे. मागच्या अनेक वर्षपासून औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्यात यावे यासाठी नामकरणाचा राजकारण सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचा दौरा केला. त्यांच्या दौऱ्याची माहिती देताना सीएमओच्या ट्वीटमध्ये संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला होता.

त्यात औरंगाबादमध्ये ‘सुपर संभाजीनगर’ असा फलक शिवसेनेचे आमदार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्याशी संबंधित एनजीओने हा फलक लावला आहे. या फलकामुळे चर्चांना नामकरणाचा मुद्दा पुन्हा तापला आहे. औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता आहे. तर, याआधी खासदार देखील शिवसेनेचेचं होते. तर, राज्याचे मुख्यमंत्रीपद देखील शिवसेनेकडे आहे.

नामकरणाचं राजकारण सोडून हिंमत असेल तर सत्ताधाऱ्यांनी संभाजीनगर नामकरणाचा अध्यादेश काढावा असं खुलं आव्हान मनसेतर्फे देण्यात आलं आहे. आता मनसेच्या या आवाहनाला शिवसेनेने उत्तर दिले आहे.
औरंगाबाद शहराचे नामकरण २६ जानेवारीपर्यंत करुन दाखवा नाहीतर असं आव्हान मनसेकडून देण्यात आलं आहे. पण त्यांचे असे बरेच नाहीतर आम्ही बघितले आहेत. अशा धमक्यांना भीक घालत नाही. संभाजी हे नाव आमच्या हृदयात आहे. त्यामुळे आम्ही पूर्वीपासून संभाजीनगर असंच म्हणतो.

Leave a comment

0.0/5