Skip to content Skip to footer

महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचा परवाना RBI कडून रद्द

कराड जनता सहकारी बँकेनंतर अजून एका बँकेवर कारवाई

महाराष्ट्रातील आणखी एका बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (आरबीआय) कारवाई करण्यात आली आहे. कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर आता आणखी एका बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. आरबीआयकडून कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा (Subhadra Local Area Bank) बँकिंग परवाना रद्द झाला आहे. बँकेच्या कारभारातील समस्यांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. मनीकंट्रोलने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

Leave a comment

0.0/5