Skip to content Skip to footer

उत्तरप्रदेश : सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल करणाऱ्या महिलेवर पोलीस स्थानकात अधिकाऱ्याने केला पुन्हा बलात्कार

उत्तरप्रदेश : सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल करणाऱ्या महिलेवर पोलीस स्थानकात अधिकाऱ्याने केला पुन्हा बलात्कार

उत्तरप्रदेशमध्ये दिवसेंदिवस बलात्काराच्या, खून, दरोड्याच्या घटना वाढताना दिसत आहे. त्यात संपूर्ण देशभरात उत्तरप्रदेश गुन्हेगारी प्रवृत्तीसाठी सर्वत्र प्रसिद्ध होत चालले आहे. त्यात आता सामूहिक बलात्काराची तक्रार करण्यासाठी पोलीस स्थानकात पोहचलेल्या पीडितेवर पोलीस कर्मचाऱ्याने बलात्कार केला आहे.

मिळालेली माहिती अशी की, जलालाबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मदनपूर गावात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेने गुरुवारी पत्रकारांना सांगितलं की, ३० नोव्हेंबर रोजी ती आपल्या घरी पायी निघाली होती. यावेळी रस्त्यात एक कार तिच्याजवळ येऊन थांबली त्यानंतर यातील पाच जणांनी तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवलं आणि ओढत जवळच्या शेतात नेऊन सामुहिक बलात्कार केला.

या प्रकारानंतर पीडित महिलेने जलालाबाद पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी या पोलीस ठाण्यात एक पोलीस उपनिरिक्षक उपस्थित होता त्याने तिला त्याच्या खोलीत नेले आणि तिथे बलात्कार केला. या दोन्ही धक्कादायक प्रकारांनंतरही पीडितेची तक्रार नोंदवली गेली नाही. त्यामुळे तीने थेट बरेलीचे सहाय्यक पोलीस महासंचालक अविनाश चंद्रा यांची बुधवारी भेट घेतली. त्यानंतर एडीजी चंद्रा यांनी महिलेच्या तक्रारीची चौकशीचे आदेश दिले.

Leave a comment

0.0/5