Skip to content Skip to footer

पोलीस भरतीचा जीआर रद्द, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

पोलीस भरतीचा जीआर रद्द, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

पोलीस भरतीत एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी गृहविभागाने 4 जानेवारी रोजी काढलेला जीआर रद्द करण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेली आहे.

एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना ईडब्लूएसचा लाभ मिळावा म्हणून गृहविभाग आता नवीन जीआर शुद्धीपत्रक काढणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे. ४ जानेवारी रोजी गृह विभागाने काढलेल्या जीआरनुसार एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीत खुल्या प्रवर्गातून भरती व्हावे लागेल, असा उल्लेख होता. मात्र या निर्णयाला संपूर्ण राज्यभरातून विरोध होऊ लागल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

या संदर्भात गृहमंती म्हणाले की, पोलीस शिपाई भरती २०१९ करीता ज्या एसईबीसी उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यांना शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील २३ डिसेंबर २०२० च्या शासन निर्णयाचा लाभ देण्याच्या दृष्टीकोनातून सुधारित शासन निर्णय गृह विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

एसईबीसी’तून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारले जाणार तसेचवडिव शुक्ल ऑनलाइन भरण्याची मुभा देण्यात आली होती. तसेच १५ दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी लागणार असल्याचं त्या निर्णयात म्हटले होते. पोलिस महासंचालकांनी या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करुन शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यात गृह विभागाने २०१९ मध्ये पोलिस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. मात्र सप्टेंबर २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलिस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. मात्र गृह विभागाने पोलिस भरतीच्या दृष्टीने आदेश काढले होते. मात्र पुन्हा याला विरोध झाल्यानं हा जीआर रद्द करण्यात आला आहे.

Leave a comment

0.0/5