Skip to content Skip to footer

राज्यात ‘कोरोना’च्या दुसऱ्या लाटेचा कहर, वाशिम आणि सोलापूरमध्ये २७१ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

महाराष्ट्र बुलेटिन : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने कहर माजवला आहे. राज्यात कोरोना विषाणूची दुसरी लाट आली आहे आणि यावेळी हा धोका शाळांच्या मुलांपर्यंत पोहोचला आहे. राज्यातील वाशिममध्ये २२९ मुले व सोलापूरच्या दिव्यांग शाळेत ४२ मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहेत. इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आल्यानंतर सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

२२९ मुले वाशिमच्या खासगी निवासी शाळेत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यानंतर प्रशासकीय अधिकारी सर्व विद्यार्थ्यांच्या चाचण्या घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, २४ जानेवारी रोजी वाशिममध्ये शाळा उघडल्यानंतर आदेश जारी करण्यात आले होते, त्यानंतर १४ फेब्रुवारीपर्यंत मुले वसतिगृहात येऊ लागले. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता शाळेत बाहेरून आलेल्या मुलांची चाचणी घेण्यात आली. प्रथम ३० मुले पॉझिटिव्ह आली, त्यानंतर प्रशासनाने सर्व ३२७ मुलांची चाचणी घेतली, ज्यामध्ये २२९ मुले पॉझिटिव्ह आली आणि चार शालेय कर्मचारी पॉझिटिव्ह आले.

शाळेला बनवण्यात आले क्वारंटाईन सेंटर

शाळा प्रशासनाचे अधिकारी सांगतात की, सध्या या शाळेला क्वारंटाईन सेंटर करण्यात आले आहे. जे मुलं कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, अशा मुलांमध्ये ५वी ते ८वी च्या बहुतेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Leave a comment

0.0/5