औरंगाबाद जिल्ह्यात आज 70 नव्या करोनाबाधितांची नोंद

औरंगाबाद-जिल्ह्यात-आज-70-नव-Aurangabad-District-Today-70-Nov

देशभरासह राज्यात करोनाचा संसर्ग अद्यापही झपाट्याने वाढताना दिसत आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ औरंगाबाद शहरात देखील करोनाबाधितांचा संख्या दररोज कमालीचा वाढत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 70 करोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने, एकूण करोनाबाधितांची संख्या 3 हजार 106 झाली आहे.

यापैकी 1 हजार 709 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत 166 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या 1 हजार 231 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये ३१ महिला व ३९ पुरूषांचा समावेश आहे.

यामध्ये न्यू विशाल नगर (1) आझाद चौक (3) पुंडलिक नगर (1) स्वामी विवेकानंद नगर (1), हरीकृष्ण नगर, बीड बायपास (1), श्रीविहान कॉलनी (1), शक्ती अपार्टमेंट (1) गणेश कॉलनी (2) एमजीएम हॉस्पीटल परिसर (1), जाधववाडी, नवीन मोंढा (1), साई नगर, सिडको (1), टीव्ही सेंटर (1), सावित्री नगर, चिकलठाणा (1), बन्सीलाल नगर (1) औरंगपुरा (1) सुभाषचंद्र नगर, एन अकरा (1) जय भवानी नगर, गल्ली नं. एक (1) रामदेव नगर (1)बजाज नगर (2) सावरकर कॉलनी, बजाज नगर (1), त्रिमूर्ती चौक, बजाज नगर (1), इंदिरा नगर, पंढरपूर (2), जय भवानी चौक, बजाज नगर (5), सिडको महानगर दोन (1) या भागातील रुग्ण आहेत.

याचबरोबर मागील चोवीस तासांमध्ये देशभरात करोनाचे सर्वाधिक तब्बल १२ हजार ८८१ रुग्ण वाढले असून, ३३४ जणांचा करोनाने बळी घेतला आहे. याचबरोबर देशातील करोना रुग्णांची संख्या ३ लाख ६६ हजार ९४६ वर पोहचली आहे. देशातील एकूण ३ लाख ६६ हजार ९४६ करोनाबाधित रुग्णांपैकी सध्या १ लाख ६० हजार ३८४ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत १ लाख ९४ हजार ३२५ जणांना उपचारानंतर रुग्णलायतू सुट्टी देण्यात आली आहे. तर आतापर्यंत करोनामुळे देशभरात १२ हजार २३७ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here