Skip to content Skip to footer

संभाजी नगरचे महापौर नंदकुमार घोडेले यांना कोरोची लागण

संभाजी नगरचे महापौर नंदकुमार घोडेले यांना कोरोची लागण

महापौर आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख नंदकुमार घोडेले याना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर संभाजीनगर येथील सिग्मा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकारुती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.
नंदकुमार घोडेले यांच्यात काही दिवसांपासून कोरोनाची लक्षण दिसून आली होती. म्हणून त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर त्यांच्यावर संभाजीनगरच्या सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथं त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

संभाजीनगर शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे स्वतः रस्तावर उतरून नंदकुमार घोडेले हे अनेक उपाययोजना करत होते. त्यांनी कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी अनेक प्रयत्न करत होते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून विविध बैठकांनाही त्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करावी, असे आवाहन केले आहे.

Leave a comment

0.0/5