बंगळुरु : लग्नाचं वचन देऊन 25 वर्षीय युवकावर त्याच्या बॉयफ्रेण्डने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील गोरेगावमध्ये राहणाऱ्या युवकाच्या तक्रारीनंतर बंगळुरुतून आरोपीला अटक करण्यात आली.
आरोपीने वारंवार बॉयफ्रेण्डचा बलात्कार, शारीरिक अत्याचार करुन मानसिक छळ केल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे. गोरेगाव पोलिसांनी मंगळवारी बंगळुरुत आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपी शाझान शेख हा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून नोकरीनिमित्त गेल्या काही वर्षांपासून बंगळुरुत राहतो. पीडित तरुण मुंबईत एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीला आहे. काही महिन्यांपूर्वी एका डेटिंग साईटवर दोघांची ओळख झाली.
https://maharashtrabulletin.com/songs-marathi-sunnyleone/
आरोपी 24 ऑगस्टला मुंबईत आला आणि पहिल्या भेटीतच त्याने पीडिताला लग्न करण्याचं वचन दिलं. दुसऱ्याच दिवशी दोघांनी घरच्या घरी लग्न केलं. त्यानंतर तीन ते चार दिवस आरोपी जबरदस्ती पीडित तरुणावर शारीरिक अत्याचार करत राहिला.
‘त्याने मला शारीरिक, मानसिक त्रास देण्यासोबतच आर्थिक लूटही केली. आमच्या लग्नाबद्दल कोणालाही न सांगण्यासाठी त्याने माझ्यावर दबाव टाकला. आपल्या रिलेशनशीपची नव्याने सुरुवात करु, असं वचन त्याने मला दिलं. काही दिवसात परत येण्याचं आश्वासन देऊन तो बंगळुरुला निघून गेला.’ असं पीडित तरुणाने सांगितलं.
‘मी काही दिवसांनी त्याला फोन केला, तेव्हा त्याने साधी ओळखही दाखवली नाही आणि माझा नंबर ब्लॉक केला.’ असंही तक्रारदार युवकाने सांगितलं आहे. पोलिसांनी कलम 377 आणि 420 अन्वये आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.