Skip to content Skip to footer

हिंदुस्थान व रशियात बिनसले? शस्त्रास्त्र खरेदीत घट

जगात जेव्हा कधीही दोन मित्र राष्ट्रांबद्दल बोलले जाते त्यावेळी हिंदुस्थान व रशिया या दोन देशांची नावं आवर्जून घेतली जातात. रशियाची आणि हिंदुस्थान एकमेकांच्या मदतीसाठी कायम तयार असतात. पण सध्या दोन्ही देशांचा एकमेकांशी असलेला संपर्क कमी झाल्याची चर्चा आहे. जगासमोर जरी हे दोघे एकमेकांचे घनिष्ट मित्र असल्याचे चित्र दिसत असले तरी सत्य परिस्थिती मात्र वेगळी आहे, असे बोलले जात आहे. हिंदुस्थानने रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी करणेही कमी केले आहे, असा दावा स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टीट्यूटने केला आहे.

यासाठी SIPRI च्या आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र खरेदीचा हवाला देण्यात आला आहे. 2018 नुसार 2014-2018 यादरम्यान, हिंदुस्थान व रशिया यांच्यातील शस्त्रास्त्र निर्यातीचे व्यवहार पूर्वीपेक्षा कमी झाले आहेत. या तुलनेत 2009-13 यामध्ये रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी करण्याचा हिंदुस्थानचा टक्काही घसरला आहे. हा आकडा आधी 76 टक्के होता. पण 2014-2018 मध्ये कमी होऊन तो आता 58 टक्कयांवर आला आहे. हिंदुस्थान -पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले असतानाच स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टीट्यूटने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

तर दुसरीकडे चीनकडून पाकिस्तानला व्यवस्थित रसद पुरवली जात आहे. दरम्यान रशियातील शस्त्र खरेदीत घट झाली असली तरी शस्त्रास्त्र खरेदी करणाऱ्या देशांमध्ये हिंदुस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. आर्थिक वर्ष 2014-18 मध्ये अमेरिका, फ्रान्स आणि इस्त्रायलने हिंदुस्थानमध्ये आपल्या शस्त्रास्त्रांची निर्यात वाढवली आहे.

Leave a comment

0.0/5