Skip to content Skip to footer

आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात, या मतदारसंघातून लढवणार निवडणूक?

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात युवासेनेचे अध्यक्ष व शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेही उतरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजन विद्यमान खासदार आहेत. मात्र ही जागा आदित्य यांच्यासाठी अधिक सुरक्षित असल्याचं मानलं जात आहे.

उत्तर-पश्चिममध्ये शिवसेनेचे गजानन कीर्तिकर विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे या दोन्हींपैकी एका मतदारसंघातून आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या राजकारणापासून मी स्वत:ला कधीही दूर ठेवलेले नाही. गरज असेल तेव्हा मी लढेनही. लोकप्रतिनिधी म्हणून मोठे काम करता येऊ शकते, असं यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं.

Leave a comment

0.0/5