Skip to content Skip to footer

पाकड्यांना चोख उत्तर देणाऱ्या मराठमोळ्या, कट्टर शिवसैनिक प्रशांत वेंगुर्लेकरांच्या आई-वडिलांचा शिवसेनेतर्फे सत्कार…!

पाकड्यांना चोख उत्तर देणाऱ्या मराठमोळ्या, कट्टर शिवसैनिक प्रशांत वेंगुर्लेकरांच्या आई-वडिलांचा शिवसेनेतर्फे सत्कार…!

शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर शिकलेला शिवसैनिक हिंदुस्तानविरोधी अपशब्द कदापी एकूण घेणार नाही आणि हे कृत्य करणाऱ्यांना जागीच त्याला तोडीस-तोड शिवसेना स्टाईलने उत्तर देणे ही शिवसैनिकांची खासियत आपण अनेकदा बघितली असेल.

https://twitter.com/vengurlekarpras/status/1295475246187909120?s=19

असाच एक प्रसंग जर्मनी मध्ये घडला आहे. जर्मनीत भारताविरोधात नारे देणाऱ्या पाकिस्तान आणि खलिस्तान समर्थकांच्या घोळक्यांना शिवसैनिक प्रकाश वेंगुर्लेकर यांनी सडेतोड उत्तर दिले होते. भारताविरोधात नारे देणाऱ्या समर्थकांना ” बाप बाप होता है” असे म्हणत वेंगुर्लेकरांनी त्यांच्या समोरच भारताचा तिरंगा फडकवला होता. हे म्हटल्यानंतर उपस्थित पाकिस्तानी समर्थक त्यांच्या अंगावर धावून सुद्धा आले होते मात्र वेंगुर्लेकर यांनी घोषणा देणे सुरूच ठेवल्या होत्या.

पाकडयांना-चोख-उत्तर-देणा- Pakdaanna-chokh-uttar-dena

आता त्यांच्या याच शौर्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. मराठमोळ्या, शिवसेना कुलाबा शाखेचे कट्टर शिवसैनिक प्रशांत वेंगुर्लेकर यांच्याशी शिवसेना विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी सवांद साधला व त्यांच्या आई, वडील, बहीण यांचा शिवसेना पक्षामार्फत सत्कार केला.

Leave a comment

0.0/5