Skip to content Skip to footer

सार्वजनिक क्षेत्रातील या २६ कंपन्या भाजपा सरकार काढणार विकायला ?

सार्वजनिक क्षेत्रातील या २६ कंपन्या भाजपा सरकार काढणार विकायला ?

देशाची सध्या आर्थिक परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. त्यात आर्थिक विकास दरामध्ये मोठी घसरण झाल्याचेही दिसून येत आहे. त्यात आता समोर आलेल्या आकडेवारीनुसार देशा समोरील आर्थिक संकट अधिक गडद होत चालले आहे. परिस्थिती इतकी चिंताजनक आहे की सार्वजनिक क्षेत्रातील आपली हिस्सेदारी केंद्र सरकार विकण्यासंदर्भात योजनाआखत आहे.

याच संदर्भात २७ जुलै २०२० रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी एक महत्वाची घोषणा करताना केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील २३ कंपन्यांचे खाजगीकरण करणार असल्याचे सांगितले होते. या निर्णयाला मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये हिरवा कंदीलही मिळाला आहे. मात्र त्या कंपन्या कोणत्या असणार याबाबतची माहिती अजूनही दिली नव्हती.

मात्र माहितीच्या अधिकाराखाली सरकारकडून मागवण्यात आलेल्या माहितीद्वारे सार्वजनिक क्षेत्रातील २३ नाही तर २६ सरकारी कंपन्यांची हिस्सेदारी सरकार विकणार आहे. तसेच या कंपनीच्या बाजारमूल्यावर सर्व अवलंबून राहणार आहे. या संदर्भात वृत्त देखील न्युज १८ हिंदीने दाखविले आहे.

Leave a comment

0.0/5