‘बिहारमधून निवडणुकीचे मुद्दे संपले असतील तर महाराष्ट्रातून पार्सल होतील’ – संजय राऊत.
बिहार निवडणुकीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपाला टोला लगावला आहे. बिहारमध्ये विकासाच्या, कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे. पण जर मुद्दे संपले असतील तर मुंबईतून पार्सल होतील, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते आज एएनआय या वृत्त समूहाशी बोलत होते. तसेच पुन्हा एकदा बिहार विधानसभा निवडणुकीवरुन प्रश्न उपस्थित करत कोरोना संपलाय का ? अशी विचारणा केली आहे. ‘बिहार निवडणुकीसाठी काय व्यवस्था करण्यात आली आहे हे देशाला सांगावं”, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
विधानसभेची मुदत संपत असेल तर निवडणूक झालीच पाहिजे. पण बिहारमध्ये करोना संपला आहे का? हेदेखील पाहिलं गेलं पाहिजे. जर कोरोना संपला नसेल तर तुम्ही निवडणूक कशी घेणार आहात, प्रचारसभा कशा होणार? मतदान तर ऑनलाइन करु शकत नाही, त्यासाठी जाऊन रांगेत उभं राहावं लागेल. सोबत मतदानाची टक्केवारीही कमी नाही झाली पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करणं गरजेचे असून गरीब लोक आज घराबाहेर पडत नाहीयेत. बिहार एक मोठं राज्य आहे. देशाच्या राजकारणात बिहारचं महत्व आहे. त्यामुळे तिथे निवडणूक कशा पद्धतीने होणार आहे ? काय