Skip to content Skip to footer

दिल्लीतील रस्त्यावर इंदिरा गांधी आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र पोस्टर

दिल्लीतील रस्त्यावर इंदिरा गांधी आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र पोस्टर

आर रिपब्लिकचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या राहत्या घरातून पनवेल पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक केली होती. या अटकेनंतर राज्यातील भाजपा नेत्यांनी तसेच केंद्रात बसलेल्या बड्या-बड्या मंत्र्यांनी थेट ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले होते. तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीची आठवण करत झालेल्या अटकेची आणीबाणीशी तुलना केली होती.

त्यातच आता दिल्लीच्या रस्त्यावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे एकत्र फोटो असलेले बॅनर लावून आणीबाणीची आठवण करून दिली होती. यावर आजच्या शिवसेनेच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे. ‘दिल्लीच्या रस्त्यांवर उद्धव ठाकरे व इंदिरा गांधी यांची पोस्टर्स चिकटवून आणीबाणीची आठवण लोकांना करून देणे हा बालिशपणा तर आहेच, पण अज्ञानसुद्धा आहे.’, असे सामनामधून सांगण्यात आले आहे.

‘इंदिरा गांधींशी तुलना होणे ही गौरवाचीच बाब आहे. भारताच्या फाळणीचा सूड याच पोलादी स्त्रीने पाकिस्तानची फाळणी करून घेतली. असे धाडस पाकिस्तानच्या बाबतीत एकाही ‘मर्द’ म्हणवून घेणाऱ्या राज्यकर्त्यास दाखवता आले नाही’, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचा पराभव जरूर झाला, पण त्याच इंदिरा गांधींना देशाच्या जनतेने पुन्हा विजयी केले. देशाच्या अखंडतेसाठी इंदिराजींनी शेवटी प्राणाचे बलिदान दिले. असा दुर्दम्य त्याग नंतर एखाद्या तरी पंतप्रधानाने केला असेल तर दाखवा. भाजपने दिल्लीच्या रस्त्यावर इंदिराजी व उद्धव ठाकरे यांचे एकत्र चेहरे लावले असतील तर त्याचे स्वागत आहे, असे सामनाच्या लेखात म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5