Skip to content Skip to footer

सर्व ताकदीने सरकार आल्यानंतरही राममंदिर उभारण्याची भाजपची हिंमत नव्हती – उद्धव ठाकरे

सर्व ताकदीने सरकार आल्यानंतरही राममंदिर उभारण्याची भाजपची हिंमत नव्हती – उद्धव ठाकरे

शिवसेनेचे नेते व खासदारं संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त रोखठोक मुलाखत घेतली होती. या मुलाखतीती शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री द्वव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा चांगलाच समाचार घेतला होता.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देखील भाष्य केले आहे. संजय राऊत यांनी, ‘मंदिरे उघडण्याच्या निमित्ताने हा विषय सुरुवातीला आला. आपण आता मंदिरे उघडलेली आहात, पण मंदिरं उघडणं आणि हिंदुत्व यांचा काही संबंध आहे का?’ असा सवाल केला असता उद्धव ठाकरे यांनी, ‘मी शिवसेनाप्रमुखांचं आणि माझ्या आजोबांचं हिंदुत्व मानतो.

पुढे बोलताना ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय… मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे… आणि ते त्यांनी 92-93 साली करून दाखवलं. बाबरी पाडली गेली, मी म्हणेन त्याचेसुद्धा श्रेय घेण्याची कुणाची हिंमत नव्हती, ती शिवसेनाप्रमुखांनी दाखवली. असे ते म्हणाले.

Leave a comment

0.0/5