Skip to content Skip to footer

देशाचे प्रधानमंत्री आपले कौतुक करायला पुण्यात येणार असतील : सुप्रिया सुळे

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्याच्या पुणे दौऱ्याची जोरदार तयारी सुरु आहे.या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूटला आज सकाळपासूनच कडक पोलीस बंदोबस्त आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने सिरम इन्स्टिट्यूटची पाहणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दुपारी 1 वाजता सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत.दुपारी एक ते दोन यावेळेत मोदी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये असणार आहेत.

दरम्यान, फेब्रुवारी अखेरपर्यंत देशात लसीकरण मोहिमेची सुरूवात होण्याची शक्यता आहे.तर देशात लसीकरणाचा सगळा खर्च केंद्र सरकार करण्याची शक्यता आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने ही मोठी बातमी दिली आहे. कोरोना लसीकरणाचा सगळा खर्च उचलण्यासाठी बजेटमध्ये मोठी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.

तर दुसऱ्या बाजूला देशाचे प्रधानमंत्री आपले कौतुक करायला येणार असतील, मी त्यांच्या दौऱ्याचा चांगला अर्थ काढतेअसे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. आपल्या सरकारला एक वर्ष होणार आणि देशाचे प्रधानमंत्री आपल्या जिल्ह्यातल्या ठिकाणी काम होतंय हे बघण्यासाठी येणार याच्यापेक्षा काय मोठे यश आपल्या सरकारचे असेल ? असेही त्या पुढे म्हणाल्या.झी २४ तासने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

Leave a comment

0.0/5