Skip to content Skip to footer

भारतात येणारी हवाई वाहतूक बंद करा, पृथ्वीराज चव्हाण यांची केंद्रकडे मागणी

भारतात येणारी हवाई वाहतूक बंद करा, पृथ्वीराज चव्हाण यांची केंद्रकडे मागणी

देशात कोविड रुग्ण संख्या कमी होत असली तरी देशातून कोरोना संसर्गाचे संकट पूर्णपणे संपलेले नाही. आज कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी पुन्हा कोरोनाच्या संसर्गाचा धोका कायमच आहे. युकेमध्ये कोरोनाचे नवे संकट पुन्हा थाटले आहे. त्यामुळे, युकेतून भारतात येणारी हवाई प्रवास वाहतूक बंद ठेवली पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सूचवले आहे.

आज कोरोनाची संख्या १ कोटीच्या वर पोहोचली असली तरी दररोज आढळणारे नवे रुग्ण व बळींची संख्या कमी होत आहे. विषाणूजन्य रोगांचे तज्ज्ञ डॉ. शाहिद जमील यांनी सांगितले की, देशात नोंदविल्या गेलेल्या रुग्णांपेक्षा प्रत्यक्षात १६ पट अधिक आहेत, असे दुसऱ्या सिरो सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे देशात खरे तर १६ कोटी रुग्ण आहेत, असे म्हणता येऊ शकते.

कोरोना हा चीनमधून जगभर पसरला आहे, भारतातही विदेशातूनच कोरोनाचा प्रसार झाला. त्यामुळे, अतिदक्षता घेण्यासाठी आता युके ते भारत हवाई प्रवासी वाहतूक सेवा बंद करण्याची सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली आहे. ”विषाणूच्या नव्या प्रकारामुळे #UK मध्ये कोरोनाची नवी लाट पसरली आहे. सरकारने तेथून येणारी संपुर्ण प्रवासी हवाई वाहतूक ताबडतोक स्थगित केली पाहीजे असे ट्विट त्यांनी केले आहे.

Leave a comment

0.0/5