Skip to content Skip to footer

मोदी सरकारनं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर प्रणब मुखर्जींचं भाष्य; म्हणाले…

मोदी सरकारनं सन २०१६ मध्ये पाकिस्तानविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अतिप्रचार केला असं, मत दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी आपल्या आत्मचरित्रात केलं आहे. ‘द प्रेसिडेन्शियल इयर्स’ या मुखर्जी यांच्या आत्मचरित्राच्या चौथ्या खंडाचं नुकतचं प्रकाशन झालं. यात त्यांनी विविध मुद्द्यांवरील आपली मतं व्यक्त केली आहेत. या पुस्तकातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीचं परराष्ट्र धोरण, पाकिस्तानसोबत भारताची सहकार्य मोहीम याचाही उहापोह केला आहे.

पाकिस्तानकडून सातत्याने आक्रमक भूमिका अबलंबली जात असताना त्यांना उत्तर देण्यासाठी भारताकडून प्रत्यक्ष सीमा रेषा ओलांडून अनेकदा अशा कारवाया करण्यात आल्या आहेत. हा एक सर्वसाधाराण लष्करी मोहिमेचा भाग आहे. मात्र, या मोहिमेचा मोदींनी अतिप्रचार केला तसेच यावर गरजेपेक्षा जास्त बोलून आपल्या हाती काहीही लागलं नाही, अशा शब्दांत दिवंगत माजी राष्ट्रपती मुखर्जी यांनी मोदींना टोला लगावला आहे.

त्याचबरोबर, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त मोदींनी लाहोरला दिलेल्या सरप्राईज भेटीबद्दलही माजी राष्ट्रपती मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे. भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये प्रचलित असलेल्या अटींनुसार मोदींची ही भेट अनावश्यक होती असं मुखर्जी यांनी म्हटलं आहे.

Leave a comment

0.0/5