Skip to content Skip to footer

बँकांना १४००० हजार कोटींचा चुना लावणाऱ्या नीरव मोदीचा भारत प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

पंजाब नॅशनल बँकेला १४००० हजार कोटींचा चुना लावणाऱ्या हिरा व्यवसायिक नीरव मोदी याच्या भारत प्रत्यार्पणासाठी लंडनच्या वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी मान्यता दिली आहे. नीरव मोदी विरोधात भारतात एक खटला सुरु आहे त्या विरोधात त्याला उत्तर द्यावे लागणार आहे. असे लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायदंडाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

तसेच नीरव मोदी याच्या विरोधात पुरावे नष्ट करणे आणि साक्षीदारांना धमकावल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. नीरव मोदी याला भारतात आणल्यानंतर त्याच्यावर अर्थररोड जेलमध्ये उपचार करण्यात येणार आहे. तसेच त्याचे मानसिक संतुलन व्यवस्थित राहावे म्हणून योग्य लक्ष दिले जाणार आहे.

मात्र प्रत्यार्पणाच्यापूर्वी आदेशाला नीरव याने कोर्टात आवाहन दिले होते. गुरुवारी दोन वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर लंडनच्या वेस्टमिन्स्टरचे न्यायदंडाधिकारी सॅम्युएल गूजी यांनी नीरव यांच्याविरुद्ध कायदेशीर खटला सुरू आहे, ज्यामध्ये त्यांना भारतीय न्यायालयात हजर राहावे, असा निर्णय दिला.

Leave a comment

0.0/5