‘या’ राज्यात वाढलं सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय, ‘किती’ ते जाणून घ्या

महाराष्ट्र बुलेटिन : तामिळनाडू सरकारने शिक्षक आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचार्‍यांसह आपल्या सर्व कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवून 60 वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचार्‍यांसाठी सेवानिवृत्तीचे वय एक वर्ष वाढविणारे मुख्यमंत्री ईके पलानीस्वामी यांनी विधानसभेत नियम 110 नुसार ही घोषणा केली.

हा निर्णय सरकारी आणि अनुदानित शैक्षणिक संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, स्थानिक संस्था आणि 31 मे 2021 रोजी सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचार्‍यांना लागू असेल. गेल्या वर्षी मे महिन्यात मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 59 वर्ष केले होते. हा निर्णय तातडीने अंमलात आला आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या घोषणेसंदर्भात सरकारने एक आदेश जारी केला आहे.

तामिळनाडू सरकारने यापूर्वी देखील मोठ्या घोषणा केल्या आहेत. तामिळनाडू सरकारने अशी घोषणा केली होती की तब्बल एक हजाराहून अधिक शहरे आणि जिल्ह्यांची नावे बदलली गेली आहेत, जेणेकरून त्यांची स्पेलिंग तामिळ भाषेच्या जवळ असेल. तामिळनाडू राज्याचे सीएम ई पलानीस्वामी यांनी आदेश काढल्यानंतर ही बातमी समोर आली होती. १० जूनपासून हा आदेश प्रभावी देखील झाला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here