Skip to content Skip to footer

शाळांना मोफत वीज आणि पाणी द्या: प्राथमिक शिक्षक समितीचे धरणे आंदोलन

रत्नागिरीस्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने काल दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन छेडले. प्राथमिक शाळांना वीज आणि पाणी मोफत द्यावे आदी महत्वपूर्ण मागणी समितीने आजच्या आंदोलनात मांडली.

धरणे आंदोलनामध्ये प्राथमिक शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांचा पुनरुच्चार केला. त्यामध्ये 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेतील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना सुरु करावी. एमएससीआयटीसाठी मुदतवाढ देण्यात यावी. ऑनलाईन कामांचा भडिमार कमी करावा. शालेय शोषण आहारासह अैक्षणिक कामाचा दिवसेंदिवस होणारा त्रास कमी करावा, अशी मागणी करताना यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची खंत प्राथमिक शिक्षकांनी व्यक्त केली. प्राथमिक शाळांना वीज, पाणी मोफत मिळावे, अशीही मागणी शिक्षकांनी यावेळी केली. या आंदोलनामध्ये प्रभाकर खानविलकर, अरविंद जाधव, परुराम पेवेकर, अंकुश गोफणे, शंकर वरद, विश्वास बेलूरकर, कविता खेडेकर व इतर शिक्षक सहभागी झाले होते.

Leave a comment

0.0/5