पवारांचे नातू लग्नात व्यस्थ, तर बाळासाहेबाचें नातू शेतकऱ्यांची दुःख कमी करण्यात व्यस्थ…

पवारांचे नातू लग्नात व्यस्थ, तर बाळासाहेबाचें नातू शेतकऱ्यांची दुःख कमी करण्यात व्यस्थ | aditya thackeray with farmers

निवडणुकीच्या तारखा जश्या जवळ येऊ लागल्या आहेत. तसे सर्वच राजकीय पक्षाची मुले निवडणुकीला उतरण्याच्या तयारीत व्यस्थ असल्याचे दिसून येत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे सुद्धा निवडणुकीला उभारण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. तसे संकेत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिलेले आहे. सिने अभिनेता रजनीकांत यांच्या मुलीच्या लग्नाला शरद पवार यांचे नातू रोहित पवार आवर्जून हजर होते. आज महाराष्ट्र्रात दुष्काळ पडलेला असताना राजकारणात उतरण्याची भाषा करणाऱ्या पवार कुटुंबाच्या राजपुत्राला शेतकऱ्यांचे कष्ट, दुःख आणि त्यांचा यातना का बर दिसत नाहीत. आज जिथे दुष्काळ परिस्तिथी निर्माण झालेली असताना पवारांचा राजपुत्र आपली जिंदगी स्वतःच्या मर्जीने जगण्यात व्यस्थ आहे ते जनतेचे प्रश्न कसे काय सोडवणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

पण या सर्वांना अपवाद ठरले ते, शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, आज महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर होऊन पाच ते सहा महिने उलटली आहे. जितक्या गतीने शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळाली पाहिजे तितक्या लवकर ती पोहचलेली नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी मागील काही महिन्या पासून महाराष्ट्रातील अनेक दुष्काळ भागातील जनतेला भेटी देऊन शिवसेना तर्फे पाण्याचे टँकर वाटप, पशु खाद्य वाटप तसेच ५० टक्के अनुदानावर गाई, म्हशी आणि शेळ्या वाटण्यासाठी ३००० शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप असे अनेक उपक्रम आदित्य ठाकरे यांच्या हस्ते राबविण्यात आले आहे.

मी शिवसैनिक म्हणून आपल्या भेटीला साहेबांच्या आदेशाने आलेलो आहे या वाक्याने अनेक शेतकऱ्यांना ही धक्का बसला.
आज येणाऱ्या निवडणुका पेक्षा शेतकऱ्यांचे दुःख कमी करण्यासाठी शिवसेना व युवासेना नेते आदित्य ठाकरे दुष्काळ भागातील जिल्ह्यचा दौरा करत आहे. तर दुसकीकडे पार्थ पवार हे कोणत्या मतदार संघातुन उभे राहणार आहे या विषयाला राष्ट्रवादी मध्ये जास्त महत्व आहे. आज शेतकरी वर्गाच्या दुःखा पेक्षा पवार कुटूंब सत्तेत कसे येईल यावर भर दिला जात आहे व युथ आयकॉन म्हणून पार्थ पवार यांना महाराष्ट्रा समोर प्रसिद्ध केले जात आहे. यावर जनता पवार कुटुंबियांवर विश्वास ठेऊन पार्थ यांना स्वीकारते का हे येणाऱ्या दिवसात दिसून येईल.

2 प्रतिक्रिया

  1. 12 महिने झोपलेला असता का तुम्ही. कधी वेळ असेल तेव्हा रोहित दादा सोबत फिरून घ्या.तेवढेच शेतकऱ्यांच्या समस्या किती खोल आहेत समजेल.बारामती ऍग्रो, भीमथडी काय आहे एकदा जाऊन पहा.आदित्य ठाकरे ची बाजू मांडता ते इतर दिवस कुठे असतात माहीत असेल च तुम्हाला. तुमचे पेज आम्ही न्युज बुलेटिन म्हणून वाचायचे की सामना चे दुसरे पेज म्हणून.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here