Skip to content Skip to footer

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाण्याच्या युवक-युवकांशी साधला मुक्त संवाद

शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपवन येथे “युवा टू युवा आओ बात करे” या कार्यक्रमात ठाण्यातील तरुण आणि तरुणींशी मुक्त संवाद साधला होता. या संवादात तरुण-तरुणींच्या शिक्षणाच्या समस्या, दळणवळनाचे नियमन आणि मिळणाऱ्या सुविधा या सारख्या भेडसावणाऱ्या प्रश्नांना युवासेनेच्या माद्यमातून बदलाव घडू शकतो असे आदित्य ठाकरे यांनी आपले मत मांडले आणि दिलखुलासपणे तरुणांच्या प्रश्नांना उत्तरे सुद्धा दिली होती. ठाण्यातील तरुणाने धारावी बद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुंबईत विकास करताना एक नाही तर अनेक खात्याच्या परवानग्या घ्याव्या लागतात हे समजवून सांगताना आदित्य ठाकरे यांनी मुंबईचे रस्ते विकास करताना रस्त्यावर ट्राफिक असते हे मूळ कारण सांगितले तसेच अनेक रस्त्याच्या बांधकामासाठी ४१ भागाच्या परवानग्या घेण्याची आवश्यकता असते असे ही आवर्जून आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की,आज वोट देऊन काम होत नसेल तर ठाण्यातील जनतेने आम्हाला भ-भरून प्रेम केले नसते. हे लेक दिसले नसते, ठाण्यात चांगले रस्ते दिसले नसते. मुंबईत आज आपण ६१ शाळा नवीन बांधल्या आहेत. ९१ शाळेचे रूप बदलले आहे. आज मुंबईतील शाळेचा महानगर पालिकेच्या माध्यमातून आपण पूर्ण चेहरा-मोहरा आणि शिक्षण पद्धती बदलून टाकली आहे. तसेच शाळेतील प्रत्येक विद्यार्थांसाठी आरोग्य तपासणी, मिड-डे मिल्स या सारखे उपक्रम राबवत असतो. आज आपण ज्यांना वोट देतो त्यांनी वचननाम्यात आपल्याला काय आश्वासन दिले आणि ते पूर्ण केले का हे ही पाहणे महत्वाचे आहे.

आज स्व-रक्षणाचे धडे का महत्वाचे आहे हे उपस्थित तरुणींना पटवून देताना आज बातम्यांवर मुलींना कुठे अत्याचार, कुठे ऍसिड हल्ला, कुठे रेप अश्या प्रकारच्या गोष्टीसाठी आपण मुलींना दोषी ठरवतो. त्यामुळेच आता ४ थी पासूनच मुलींना चांगले काय, वाईट काय हे आपण शिकवणार आहे. परंतु आता मुलींना स्व-रक्षणाचे धडे स्वतःचे रक्षण करण्यासाठी त्यांना शिकवत आहे. आज गावा-गावात स्व-रक्षणाचे धडे आम्ही युवासेनेच्या मार्फेत देण्याचे काम करत आहे. त्यात मुलींचा कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे. अश्या प्रकारे युवकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन सर्वांची मने जिंकण्यात आदित्य ठाकरे यशस्वी झाले असे बोलले तर वावगे ठरणार नाही.

Leave a comment

0.0/5