Skip to content Skip to footer

अमोल कोल्हे शूटिंग मध्ये व्यस्थ, राष्ट्रवादी कार्यकर्ते त्रस्त

शिरूर मतदार संघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिने-अभिनेता डॉ.अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिलेली आहे.त्यामुळे आधीच नाराज झालेले शिरूर मतदार संघातील कार्यकर्ते कोल्हे यांच्या वागणुकीमुळे अक्षरशः कंटाळले आहे.गेल्या चार-पाच दिवसापासून अमोल कोल्हे हे मुंबईत आपल्या शूटिंग मध्ये व्यस्त असल्यामुळे ते मागील काही दिवसा पासून आपल्या मतदार संघातून गायब आहेत तसेच कार्यकर्त्यांच्या फोनला उत्तर सुद्धा देत नाहीत. त्यामुळे त्यांचा प्रचार करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची पंचायत झालेली आहे.

शिरूर मतदार संघात आधीच कोल्हे यांना उमेदवारी दिल्यामुळे जुने राष्ट्रवादीचे निष्ठावान कार्यकर्ते या निर्णयावर नाराज होते. माजी आमदार विलास लांडे हे शिरूर मतदार संघातून इच्छुक होते. परंतु राष्ट्र्वादीने आयात उमेदवार सिने अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊन शिरूर मतदार संघातील कार्यकर्त्यांना नाराज केले होते. तसेस तेथील कार्यकर्त्यांनी सुद्धा कोल्हे यांचा प्रचार न करण्याची शपथच घेतलेली होती. त्यातच कोल्हे यांच्या अश्या वागणुकीमुळे पुन्हा शिरूर मतदार संघातील कार्यकर्ते नाराज झालेले दिसून येत आहे. तसेच या बद्दलची खदखद त्यांनी पक्ष श्रेठींकडे बोलून सुद्धा दाखवलेली होती.

शिरूर मतदार संघाचा विस्तार फार मोठा आहे. जुन्नर तालुक्या पासून ते हडपसर पर्यंत हा मतदार संघ पसरला आहे. त्यामुळे एकदा तरी उमेदवार आमच्या गावात येऊन जावा ही सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. एका बाजूला अमोल कोल्हे नॉट-रिचेबल असताना तालुक्यातील कार्यकर्त्यांना नेत्याचे मार्गदर्शन मिळत नाही अशी सुद्धा बोंब आहे. त्याच बाजूला खासदार शिवाजी पाटील यांचा गावो-गावी प्रचार चालू आहे. सर्व लोकांच्या भेटी-गाठी सुद्धा चालू झालेल्या आहे. सोशल मीडिया द्वारे सुद्धा प्रचारावर जोर दिला जात आहे. त्यातच तुमचे उमेदवार प्रचाराला नॉट-रिचेबल आहेत तर पुढे काय होईल असेच प्रश्न सध्या विभागातील मतदार राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारत आहे.

1 Comment

  • Avinash sakore
    Posted March 29, 2019 at 3:17 pm

    Amol kolhe attach gayab zale pudhe kay honar

Leave a comment

0.0/5