Skip to content Skip to footer

Lok sabha 2019 ममतांना धक्का, खासदारापाठोपाठ एक बडा नेता भाजपच्या छावणीत

आगामी लोकसभा ( Lok sabha election 2019 ) निवडणुकीपूर्वी प.बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमुल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बैरकपूर औद्योगिक नगर येथील भाटवारा क्षेत्रातील बडे नेते आणि विद्यमान आमदार अर्जुन सिंह यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. नवी दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी भाजपचे कमळ हातात घेतले.

महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार?

लोकसभा निवडणुकीमध्ये अर्जुन सिंह यांना भाटवारामधून तिकीट देण्यात आले आहे. तर तृणमुलकडून खासदार दिनेश त्रिवेदी येथून लढणार आहेत. या भागामध्ये हिंदी भाषिकांचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे या भागातील बडे प्रस्थ आपल्या छावणीत आल्याने भाजपला हायसे वाटले आहे. याआधी मंगळवारी बोलपूर क्षेत्रातील तृणमुल खासदार अमुपम हाजरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केले होता.

भाजप प्रवेशानंतर बोलताना अर्जुन सिंह म्हणाले की, बैरकपूरमधील तृणमुलकडून मला खासदारकीचे तिकीट मिळेल अशी आशा होती. परंतु पक्षाने त्रिवेदी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मी भाजपमध्ये प्रवेश केला.

Leave a comment

0.0/5