Skip to content Skip to footer

खोटी दाढी मिशी लावून आम्हाला छत्रपती संभाजी महाराज सांगायचा प्रयत्न करू नका- शरद सोनावणे

जुन्नर तालुक्याचे आमदार आणि काहीच दिवसापूर्वी मनसेला सोडून शिवसेना पक्षात प्रवेश करणारे आ. शरद सोनावणे यांनी राष्ट्रवादी पक्षाचे नवनिर्वाचित उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर टीकेची तोफ डागलेली आहे. खोटी दाढी मिशी लावून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज सांगायचे काम करू नका असे आरोप सुद्धा आमदार सोनावणे यांनी राष्ट्रवादीचे कोल्हे यांच्यावर लावलेले आहे. काल जाहीर झालेल्या राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादी मध्ये राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांना डावलून डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव जाहीर करण्यात आले होते.

राष्ट्रवादी पक्षाची दुसरी यादी जाहीर होताच अवघ्या काही तासातच आमदार शरद सोनावणे आणि खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांची जाहीर सभा झाली होती. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीची संभाव्य उमेदवार जाहीर होताच त्यांनी स्वतः निभावत असलेल्या पात्राचे आणि राजकारणाचा काही संबंध नाही असे बोलून दाखविले होते. परंतु राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव घेऊन स्वतः राजकारण करत असताना कोल्हे अनेक वेळा दिसून आले होते. त्यामुळे स्वतःच निभावलेल्या पात्रांचा आपल्या वैयक्तिक राजकारणासाठी उपयोग करून घेताना दिसून येत आहे.

खा. पाटील यांनी शिवजन्मभूमी शिवनेरी गड ते संभुराजे स्मुर्ती स्थळ म्हणजे वढू तुळजापूर अशी रैली काढली होती. आज राष्ट्र्वादीने बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी देऊन राष्ट्रवादी पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्याचा रोष ओढावून घेतलेला आहे. आज सर्वत्र राष्ट्रवादीच्या विलास लांडे यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर बाजी करून अढळराव पाटील पुन्हा खासदार म्हणून चालतील पण हा बाहेरचा कोल्हे याला कसल्याही परीस्थितीत निवडणून आणायचा नाही असेच माजी आमदार विलास लांडे यांच्या समर्थकांनी ठरविले आहे. त्यातच जुन्नरचे आमदार सोनावणे यांच्या शिवसेना पक्षाच्या प्रवेशामुळे शिरूर मतदार संघात शिवसेनेचे वजन वाढून खा. पाटील यांचा विजय निश्चित असाच समजला जात आहे.

Leave a comment

0.0/5