Skip to content Skip to footer

शरद पवार उद्या फोडणार नातवाच्या प्रचाराचा नारळ

पार्थ अजित पवार यांना शुक्रवारी लोकसभा निवडणुकीची तिकीट जाहीर झाल्यावर उद्या रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा पार्थ पवार यांचे आजोबा आपल्या नातवाच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे. पार्थ पवार यांना तिकीट जाहीर झाल्या पासूनच पार्थ आणि अजित पवार यांनी मावळ मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या भेट घेण्याचे सूत्रच चालू केले आहे. पार्थ पवार यांनी एकवीरा आईचे दर्शन घेऊन येणाऱ्या निववडणुकीला यश देण्यासाठी आशीर्वाद सुद्धा मागितलेला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या संध्याकाळी शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पार्थ यांना अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर केल्यानंतर स्थानिक पातळीवर वेगाने हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी नुकतीच राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे.

मवाळ मतदार संघातून पार्थ पवार आग्रही होते परंतु आमच्या घरातील नवीन सदस्य येणाऱ्या लोकसभेला उतरणार नाही असे बोलून सुद्धा दाखविले होते आणि शरद पवार यांनी आपल्या स्वतःची उमेदवारी माढा मतदार संघातून जाहीर केली होती. परंतु पवार नीती सहजा-सहजी कोणालाच समजू शकत नाही कालांतराने शरद पवार यांनी आपली माढा मतदार संघातून उमेदवारी माघारी घेऊन पार्थ यांच्या नावाची घोषणा केली होती. राष्ट्र्वादीने जाहीर केलेल्या आपल्या दोन्ही यादीत माढा मतदार संघाचे नाव गुलदस्त्यातच ठेवलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपलेच नाव माढा मतदार संघातून जाहीर करून पवार अनेकांना धक्का देऊ शकतात.

पार्थ पवार यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी निश्चित झाल्यावर पवार कुटुंबीयांनी सेलिब्रेशन केले. पार्थच्या लोकसभा निवडणूक लढण्यावरुन पवार कुटुंबात वाद सुरु असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. एवढच नाही तर, शरद पवार यांनी निवडणूक लढण्याबाबत पुर्नविचार करावा अशी फेसबुक पोस्ट रोहीत पवार यांनी केल्याने पार्थ आणि रोहीत यांच्यात संघर्ष असल्याचीही चर्चा सुरु होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री पवार कुटुंबातील काही सदस्यांनी एकत्र येऊन सेलिब्रेशन केले. यावेळी सुप्रिया सुळे, पार्थ पवार आणि सोबतच रोहीत पवारही उपस्थित होते. या सेल्फीत सुप्रिया आणि पार्थ असे दोन लोकसभेचे उमेदवार आहेत.

Leave a comment

0.0/5