भाजपकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बड्या नेत्यांच्या मुलांचा पक्षप्रवेश करण्यात येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत विविध ठिकाणी पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टरवर आपला पाळणा हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार असा खोचक प्रश्न भाजपाला विचारण्यात आला आहे. नुकतेच काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटीलनंतर राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहित पाटील यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यावरून राष्ट्रवादी व काँग्रेसला खिंडार पडल्याचे बोलले जात आहे.
पण आज राष्ट्रवादी पक्षाच्या युवकांनी आपल्या अध्यक्षांना प्रथम हा सल्ला दिला पाहिजे होता. छगन भुजबळ, गणेश नाईक, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे हे सुद्धा आपल्या पक्षात आयात करण्यात आलेले नेते आहे. आताच काही दिवसापूर्वी आपल्या पक्षात आलेले शिवसेना बंडखोर डॉ. अमोल कोल्हे ह्यांनी सुद्धा शिवसेना पक्षातूनच आपल्या पक्षात प्रवेश केला आहे. मग आपण केलेली बॅनरबाजी खरी कोणाला शोभून दिसते. आज विलास लांडे सारखे उमेदवार असताना कोल्हे यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काय साध्य करणार आहे. आज राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधील जर युवक दुसऱ्या पक्षात जात असतील तर आपल्या पक्षाचे भविष्य साऱ्या महाराष्ट्राला दिसून येत आहे.
नेते पळवणारी टोळी जरी महाराष्ट्रात फिरत असली तरी त्या टोळीचा खरा सरदार हे शरद पवारच आहे. “मी नाहीं त्यातली आणि कडी लावा आतली” अशीच आज राष्ट्रवादीची परिस्थिती झालेली आहे. आज आपण लावलेल्या पोस्टरमुळे महाराष्ट्रात आणि मुंबईत राष्ट्रवादीचे हसू झाले आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचा अभ्यास करूनच इतरांना नाव ठेवत जावा आणि येणाऱ्या निवडणुकीला ह्या जनतेला कोणती खोटी आश्वसने देणार याचा आपण विचार करावा. एक म्हण हिंदीत गाजलेली आहे ” जैसी करणी वैसी भरणी” हीच म्हण राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला शोभून दिसतं आहे.